पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारात नक्षलवादी सहभागी असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिलाय. झी मीडियाला या अहवालाची प्रत प्राप्त झालीय. शहरात असलेले नक्षलवाद्यांचे ५ मास्टर माईंड आणि त्यांच्याशी संबंधित संघटना यांच्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती गृहमंत्रालयाला दिलीय.
या ५ मास्टरमाईंडचा भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभाग असल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांनी गृहमंत्रालयाला दिलेत. आईबीच्या अहवालात एका वकिलाचंही नाव आहे तर नागपूरचा एक प्रोफेसरही नक्षल समर्थक असल्याची माहिती या अहवालात आहे.
नक्षल समर्थकांचे प्रत्यक्ष जंगलातल्या नक्षलवाद्यांशी पैशांचे व्यवहार झाल्याचंही या अहवालात नमूद आहे. शहरात नक्षलवाद्यांचं नेटवर्क मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या संघटनांची नावं या अहवालात नमूद आहेत.