पुणे विद्यापीठाचा प्रताप, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दाखवलं गैरहजर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Updated: Jul 26, 2017, 06:10 PM IST
पुणे विद्यापीठाचा प्रताप, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दाखवलं गैरहजर  title=

नितीन पाटणकर, प्रतिनिधी, झी मीडिया पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय.  या विद्यार्थ्यंनी परीक्षा दिलीय, त्यांना त्याचे मार्कही मिळालेत. पण मार्कशीटमध्ये हे विद्यार्थी गैरहजर असल्याचं दिसतंय. विदयार्थ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत विद्यापीठात संपर्क साधला. पण त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत.

हा प्रकार खेड-शिवापूर येथील स्कुल ऑफ अर्कीटेक्चरच्या विद्यार्थ्यांबरोबरही घडलाय. इथे तर तब्ब्ल १४० विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसलाय.

मार्कशीटवर नापास लिहून आल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशही मिळत नाही, त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. तसंच शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कुलगुरू कारवाई करतील का हा खरा प्रश्न आहे. मात्र या विषयावर कुलगुरू यांनी बोलणं टाळलं.