पुणे : शौचालायासमोर दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे शौचालयात जायला जागा नसल्याचा राग येऊन गाड्याच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.
दिनेश उर्फ जब्या हरी पाटील शनिवारी रात्री दारुच्या नशेत पर्वती पायथ्याजवळच्या जनता वसाहत गल्लीतल्या सुलभ शौचालायात लघुशंकेसाठी गेला, मात्र तिथे दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे त्याला शौचालयात जायला रस्ताच मिळाला नाही. त्याच रागात दिनेश पाटीलनं एका दुचाकीतलं पेट्रोल काढून ती पेटवून दिली.
बघताबघता आगीचा भडका उडाला आणि त्यात तब्बल ३० गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी दिनेश पाटीलच्या मुसक्या आवळल्या. तब्बल २७ मोटारसायकली २ सायकल आणि १ तीन चाकी टेम्पो अशी एकंदर ३० वाहन आगीत भस्मसात झाली. यातील १८ गाड्या पूर्णपणे जळाल्या असून अंदाजे ४ लाखांचं नुकसान झालंय.