पुण्याचा चहावाला महिन्याला कमावतो 12 लाख रुपये

भाजपकडून जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा एक चहावाला म्हणून प्रचारित करण्यात आलं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 4, 2018, 11:09 AM IST
पुण्याचा चहावाला महिन्याला कमावतो 12 लाख रुपये

मुंबई : भाजपकडून जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा एक चहावाला म्हणून प्रचारित करण्यात आलं. 

पंतप्रधान मोदी स्वतःला एक चायवाला म्हणून संबोधित होते. त्यानंतर अनेकदा पंतप्रधान मोदी यांनी भाषणात अनेकदा स्वतःला एक चहावाला म्हणून संबोधित करून चहावाला पंतप्रधान पदापर्यंत पोहचू शकतो तर जगात काहीच अशक्य नाही. आता पुन्हा एकदा एक चहावाला चर्चेत आला आहे. आणि आता चर्चेच कारण आहे त्याची कमाई. 

महाराष्ट्राच्या पुण्यातील हे येवले टी हाऊस. येवले हाऊसचे फाऊंडर नवनाथ येवले यांनी एक बेंचमार्क बनवलं आहे. हा चहावाला महिन्याला तब्बल 12 लाख रुपये कमाई करत आहे. नवनाथ येवले आपल्या टी हाईसला इंटरनॅशनल ब्रंड बनवण्याच्या तयारीत आहे. 

येवले टी हाऊस देतोय लोकांना रोजगार 

नवनाथ येवले यांनी सांगितलं की, आमच्या टी हाऊसमुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. आता हा व्यवसाय वाढत असल्यामुळे अधिक आनंद आहे. येवले टी हाऊसच्या पुण्यात 3 शाखा आहेत. आणि प्रत्येक ब्रांचमध्ये 12 कर्मचारी काम करतात. नवनाथ यांनी सांगितलं की, आम्ही लवकरच येवले टी हाऊसला इंटरनॅशनल ब्रँड बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

पुण्यात येवले टी हाऊस लोकांमध्ये भरपूर लोकप्रिय आहे. आणि यामुळे टी हाऊसच्या बिझनेसमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.