अमित शाह एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

भाजप अध्यक्ष अमित शाह आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत... दुपारी 12 च्या सुमारास अमित शाह यांचं नागपुरात आगमन होणार आहे... 

Updated: Mar 4, 2018, 10:48 AM IST
अमित शाह एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

नागपूर : भाजप अध्यक्ष अमित शाह आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत... दुपारी 12 च्या सुमारास अमित शाह यांचं नागपुरात आगमन होणार आहे... 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांना अमित शाह भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे... 

ईशान्येकडील राज्याच्या निवडणुकीत घवघवीत यशा नंतर अमित शाह यांची संघ प्रमुखांसोबतची ही भेट महत्वपूर्ण मानल्या जात आहे... तसेच पुढील आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 3 दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होणार आहे... या पार्श्वभूमवर शाह यांच्या संघमुख्यालाय भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.