रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा उद्या किल्‍ले रायगडावर साजरा होतोय... अखिल भारतीय शिवराज्‍याभिषेक दिनोत्‍सव समितीच्‍या वतीनं या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. 

Updated: Jun 5, 2018, 10:45 PM IST
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी title=

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा उद्या किल्‍ले रायगडावर साजरा होतोय... अखिल भारतीय शिवराज्‍याभिषेक दिनोत्‍सव समितीच्‍या वतीनं या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी अवघ्या देशभरातून शिवभक्‍त किल्‍ले  रायगडावर दाखल होतायत. मंगळवारी संध्‍याकाळी गडपूजनानंतर रात्री शाहिरी कार्यक्रम होईल. सकाळी ध्वजारोहणानंतर राजसदरेवर मुख्‍य सोहळा होणाराय. त्‍यानंतर राजसदरेपासून शिवाजी महाराजांच्‍या समाधीपर्यंत पालखी मिरवणूक काढण्‍यात येईल. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष खासदार संभाजीराजे हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित राहणार आहेत.