रेल्वे पूर्णपणे बंद... कुठेही अडकला असाल तरी बदलापूरला पोहचता येईल; ST ची खास सोय

सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. तर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहनांकडून 55 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Aug 20, 2024, 06:34 PM IST
रेल्वे पूर्णपणे बंद... कुठेही अडकला असाल तरी बदलापूरला पोहचता येईल; ST ची खास सोय   title=

Badlapur Protests :  बदलापूरमधील आंदोलनाचा रेल्वे प्रवाशांना फटका बसलाय.. आंदोलनामुळे 30 मेल एक्स्प्रेस आणि 30 लोकल ट्रेक वळवण्यात आल्या आहेत. कोयना एक्सप्रेस बदलापुरहून कल्याण नंतर बदलापूर, दिवा आणि पनवेल मार्गे कर्जतकडे मार्गस्थ करण्यात आल्यात. आत्तापर्यंत अंबरनाथ ते कर्जत खोपोली दरम्यान सुमारे 30 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्यात. सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. बदलापूर तसेच बदालपूरच्या पुडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने खास बस व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. 

आंदोलनामुळे हजारो प्रवासी अडकले आहे. एसटी महामंडळ रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. कल्याण ते कर्जत मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी 100 बसेसची तरतूद करण्यासाठी  राज्य परिवहनांकडून मदतीची विनंती केली आहे.  प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत सुमारे 55 बसेस सेवेंत आल्या आहेत. 

प्रवाशांची रिक्षा चालकांकडून लूट 

बदलापूरमध्ये होणा-या उद्रेकाचे परिणाम आता ठिकठिकाणी पाहायला मिळतायेत...अंबरनाथहून बदलापूरकडे येणाऱ्या प्रवाशांची रिक्षा चालकांकडून लूट होतेय... हि लुट थांबवण्यासाठी गावकरी तरुण रिक्षा चालकांना थांबवून प्रवाशांचे पैसे परत करायला लावतायेत... रिक्षावाले जास्तीचं भाडं आकारत  असल्यानं गावक-यांनी रिक्षावाल्यांना  बंदी घालायला सुरुवात केलीये... लूट करणा-या चालकांना जास्तीचं भाडं देउ नका असं आवाहन गावक-यांनी केलंय...
बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते.. या प्रकरणी बदलापूरात संतप्त पडसाद उमटू लागलेत.. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केले. सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन सुरु आहे. अखेरीस सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिस स्टेशनचा ताबा घेतला.