मुंबई : मुंबईत जरी जोरदार पाऊस सुरु असला तरी उर्वरित महाराष्ट्र अजूनही कोरडाच आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात अजून पावसाने हजेरी लावलेली नाही. मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. मात्र अजूनही ८० टक्के महाराष्ट्र अद्याप कोरडाच आहे. महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय. कोकणात यंदा मान्सून अगदी योग्य वेळेत दाखल झाला. त्यामुळे पेरणीची कामे आटोपली होती.
काही दिवसांची विश्रांती घेत वरुणराजा पुन्हा बरसला. मागील 4 दिवसांपासून झालेल्या पावसाने कोकणात भात पेरणीची कामं सुरु आहेत. मात्र उर्वरित ८० टक्के महाराष्ट्राला वरुणराजाची प्रतीक्षा कायम आहे. लवकरत लवकर वरुणराजानं महाराष्ट्रात सर्वदूर बरसावं अशीच आस बळीराजा व्यक्त करतो आहे.