राज ठाकरेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापलिका आयुक्त पी. वेलरासू यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे महापालिकेतील नगरसेवकही उपस्थित होते. 

Updated: Oct 29, 2017, 12:02 AM IST
राज ठाकरेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट  title=

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापलिका आयुक्त पी. वेलरासू यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे महापालिकेतील नगरसेवकही उपस्थित होते. 

नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांमध्ये प्रलंबित कामांची यादीच आयुक्तांपुढे मांडली. संबंधित कामे तातडीनं पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी आयुक्तांनी राज ठाकरे यांच्या समक्ष नगरसेवकांना दिलं.

तसंच, अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांपुढे मांडलेली संकल्पना राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांपुढेही मांडली. फेरीवाल्यांवर कारवाईमध्ये महापालिकेनं स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

त्यासाठी काही व्हाट्सअपचे मोबाईल फोन नंबर नागरिकांसाठी जाहीर करण्यात यावेत, या व्हॉटसअपवर नागरिकांना अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो देता येतील आणि महापालिकेला नियमित कारवाई करणं सोपं जाईल, असं ठाकरे यांनी सुचवले. आयुक्तांना ही संकल्पना आवडलीय, त्यांनी ती सुरु करण्याचं आश्वासन ठाकरेंना दिलं.