हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर : एकीकडे ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) एकमेकांचे वाभाडे काढतोय, त्याचवेळी ठाकरेंची वरात शिंदेंच्या दारात येतेय. हो तुम्ही बरोबर ऐकलंय. ठाकरे-शिंदेंच्या घरात एक लग्न होतंय, ज्याची चर्चा सुरु आहे. पाहुयात एक रिपोर्ट. (ramesh shinde and anuradha thackeray wedding invation card gose viral on social media)
एकीकडे शिवसेनेचे शिंदे-ठाकरे गट एकमेकांचे वाभाडे काढतायत, दोन्ही गटात रस्त्यावर राडे होतायत. त्याचवेळी शिंदेंच्या दारात ठाकरेंची वरात येणार आहे. आता शिंदे-ठाकरे सोयरिक कशी होतेय तेही पाहुयात. जुन्नर तालुक्यातल्या वडगावसहाणी गावचे सरपंच आणि ठाकरे गटाचे निष्ठावंत खंडेराव शिंदे यांचे पुतणे विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावातल्या अनुराधा ठाकरे हे दोघे रेशीमगाठीत अडकणार आहेत.
थोडक्यात शिंदे-ठाकरे कुटुंबात हा विवाह होतोय. शिंदे-ठाकरे आडनावामुळे या लग्नाची पत्रिका व्हायरल झालीय. दसरा मेळाव्यासाठी मैदानाचा वाद सुरू असताना शिंदे-ठाकरे कुटुंबात कांदे-पोह्याचा कार्यक्रम रंगत होता. पण शिंदे-ठाकरे आडनावामुळे या लग्नसोहळ्याला भलतीच प्रसिद्धी मिळालीय.
राज्याच्या राजकारणात ठाकरे-शिंदे वाद रंगलेला असताना जुन्नर-आंबेगावच्या शिंदे-ठाकरे कुटुंबात सोयरिक झाली. त्यामुळे या लग्नसोहळ्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून दोन्ही कुटुंब भलतीच खूश आहेत.