चंद्रपूर : खर्रा आणि दहा रुपयांचं आमीष दाखवून तीन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडलीय.
विसापूर या गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय.
बलात्काराच्या या दोन वेगवेगळ्या घटना असून त्या एकाच दिवशी घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. शाळेच्या प्रसाधनगृहात हे दुष्कृत्य करण्यात आलं.
यातील २० वर्षीय सुरज हनवते या आरोपीने तीनही मुलींसोबत हा प्रकार केला तर दुसरा आरोपी ५० वर्षीय लालाजी पिंपळे याने दोन मुलींसोबत अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालंय.
पीडित मुलींनी पोटात दुखत असल्याची तक्रार पालकांकडे केल्यावर वैद्यकीय तपासणीत मुलींनी ही बाब पालकांना सांगितली.
यानंतर या प्रकरणी तक्रार नोंदविली गेली. दरम्यान आरोपींनी या मुलींना शाळेतून बाहेर बोलावून हा प्रकार केल्याने पोलीस चक्रावलेत.