Castoes Coral Snake | सिंधुदुर्गात आढळला अत्यंत दुर्मिळ आणि विषारी पोवळा साप

वेंगुर्ला तालुक्यात अतिशय दुर्मिळ असलेला साप आढळला आहे. 

Updated: Nov 28, 2021, 08:36 PM IST
Castoes Coral Snake | सिंधुदुर्गात आढळला अत्यंत दुर्मिळ आणि विषारी पोवळा साप

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात अतिशय दुर्मिळ असलेला साप आढळला आहे. सापाची दुर्मिळ प्रजाती असलेला क्रॅस्टोस कोरल स्नेक (Castoes Coral Snake) म्हणजेच पोवळा साप असं याचं नाव आहे. तुळस या गावात हा साप आढळला. हा साप अत्यंत विषारी असतो. हा साप प्रामुख्याने दगड आणि पालापाचोल्याखाली आढळतो. गांडूळ, लहान बेडूक, सरडे आणि पाल त्याचे खाद्य आहेत. डोक्यावर केशरी रंगाचा पट्टा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. (rare Castoes Coral Snake was found in Tulas village in Vengurla)

सिंधुदुर्गात पोवला सापाच्या प्रजातीमध्ये 2 प्रकारच्या प्रजाती आहेत. यामध्ये स्ट्राइप कोरल स्नेक आणि क्रॅस्टोज कोरल स्नेक अशा 2 प्रजाती आहेत. क्रॅस्टो कोरल स्नेक हा फार दुर्मिळ आहे. हा साप गोव्यापासून ते साताऱ्यापर्यंत आढळून येतो. पण प्रत्यक्षात तो फार कमी दिसतो. त्यामुळे तो दुर्मिळ मानला जातो. हा साप आढळल्याने सिंधुदुर्गाची म्हणा किवां पश्चिम घाटाचीजैवविवधता अधोरिखत करणारी बाब आहे.