मुंबई : देशातील दिग्गज व्यवसायिक आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांचं आणखी एक भावूक रुप समोर आलं आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी अनेकदा सामान्यांना मदत केली आहे. रतन टाटा कायमच आपल्या कर्मचाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतात. रतन टाटा (Ratan Tata meet his ex-empolyees) यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्याकरता भावूक झाले आहेत.
Linkedin मधील एका पोस्टनुसार ८३ वर्षांचे रतन टाटा आपल्या माजी कर्मचाऱ्याला भेटायला चक्क त्याच्या घरी गेले. मुंबई ते पुणे असा प्रवास करून रतन टाटा माजी कर्मचाऱ्याच्या तब्बेतीची चौकशी करायला गेले.
रतन टाटा आपल्या माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी गेले. याचा फोटो Linkedin वर पोस्ट केला आहे. यावेळी रतन टाटा एकटे होते. रतन टाटा यांनी मुंबईहून पुणे प्रवास करत Friends Society मध्ये पोहोचले. गेल्या दोन वर्षांपासून आजारी असलेल्या कर्मचाऱ्याची रतन टाटांनी भेट घेतली.
रतन टाटा हे आपल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञ असल्याचं अनेकदा पाहिलं आहे. रतन टाटा त्या ८० कुटुंबियांना देखील भेटायला गेले. ज्यांनी २६/११ च्या मुंबई आतंकवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात केले होते.