रत्नागिरी : जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधात आज जेलभरो आंदोलन पुकारण्यात आलंय. जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधात साखरीनाटे इथल्या ग्रामस्थांनी आजही आंदोलन सुरूच ठेवलंय.
साखरीनाटे इथल्या मच्छिमारांच्या विरोधामुळे हे आंदोलन जिवंत आहे. राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुउर्जा प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेत जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय.