यूपीतील कथित धर्मांतर प्रकरणी ATS ची कारवाई, नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला नाशकात अटक

आतिफ हा कुणाल या नावाने नाशिक शहरात वास्तव्याला होता

Updated: Sep 27, 2021, 10:27 AM IST
यूपीतील कथित धर्मांतर प्रकरणी ATS ची कारवाई, नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला नाशकात अटक title=

 मुंबई : उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे. आतिफ उर्फ कुणाल नावाच्या व्यक्तीला नाशिक रोडच्या आनंद नगर भागातून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे.

बेकायदा धर्मांतर प्रकरणी नाशिक शहरातून डॉ कुणाल चौधरी उर्फ आतिफ याला अटक करण्यात आली आहे. बोगस डॉक्टर बनून धर्मांतरण करण्याच्या कारवाईमध्ये सहभागी झाला आहे.  हवालामार्फत 20 कोटी फंडिंग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमसीआयच्या परिक्षेत नापास झाल्याने अवैधपणे प्रॅक्टिस करत होता. रशियातून डॉक्टरची पदवी मिळवली होती.

उत्तर प्रदेशातील दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई केली आहे.  मुजफ्फराबाद मधून दोन धार्मिक नेत्यांनाही अटक करण्यात आलं आहे.