परतीच्या पावसाने रायगडात भातशेतीचे मोठे नुकसान...

गेले 2 दिवस सुरू झालेल्‍या सततच्या पावसाने रायगड जिल्‍हयात भातशेतीचं मोठे नुकसान झाले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 11, 2017, 06:50 PM IST
 title=

रायगड : गेले 2 दिवस सुरू झालेल्‍या सततच्या पावसाने रायगड जिल्‍हयात भातशेतीचं मोठे नुकसान झाले आहे. वादळी वा-यासह पावसाने भात शेतीला अक्षरश: झोडपून काढलं असून  कापणीसाठी आलेलं भाताचं पीक शेतात आडवं झालं आहे.

शेतात पावसाचं पाणी साचल्यामुळे भात सडण्याची  शक्यता निर्माण झाली  आहे. त्यामुळे शेतक-यांचं उत्पन्न घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदा रायगड  जिल्‍हयात 1 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली असून समाधानकारक पावसामुळं शेतक-यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र या पावसामुळं  सगळं शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळालंय.

आता भिजलेले पीक झोडून ते सुकवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. पावसाचा अंदाज घेऊन शेतक-यांनी भाताची कापणी करावी असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे.