बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम...

बैल हा शर्यतीचा प्राणी आहे का? असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम ठेवलीय. बैल हा शर्यतीच्या इतर प्राण्यांप्रमाणे कसरती करणारा प्राणी नाही.  त्यामुळे जो प्राणी ज्यासाठी बनलेलाच नाही त्याला त्यासाठी वापरणं हा त्या प्राण्यावर अन्यायच आहे. असं महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीसंदर्भातील याचिका निकाली काढलीय.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 11, 2017, 05:24 PM IST
बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम... title=

मुंबई : बैल हा शर्यतीचा प्राणी आहे का? असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम ठेवलीय. बैल हा शर्यतीच्या इतर प्राण्यांप्रमाणे कसरती करणारा प्राणी नाही.  त्यामुळे जो प्राणी ज्यासाठी बनलेलाच नाही त्याला त्यासाठी वापरणं हा त्या प्राण्यावर अन्यायच आहे. असं महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीसंदर्भातील याचिका निकाली काढलीय.

त्यामुळे यंदा राज्यात कोठेही या स्पर्धांच्या आयोजनाला परवानगी देता येणार नाही. बैलगाडी स्पर्धेदरम्यान बैलांना होणा-या इजेबाबत सरकार नियमावली बनवून सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार राज्य सरकारनं यासंदर्भात नियमावली सादर करताना बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याकरता काही बदल सुचवले होते. मात्र मुळात बैल हा घोड्याप्रमाणे शर्यतींकरता बनलेलाच नसल्यानं हा मुद्दाच उपस्थित होत नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं.