Bhaskar Jadhav on Barsu Refinery Project : कृष्णात पाटील / मुंबई : बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. आम्हाला हा प्रकल्प नको, असे म्हणत ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. माझे सरकारला सांगणे आहे की, लोकांच्या जीवाशी खेळून आपला पक्ष मोठा होण्यासाठी राजकारण करत असाल, विशेष करुन भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे. तर, तुमचा असा पक्ष वाढणार नाही. कोकणातील जनता खरं काय आणि खोटं काही समजून घेणारी जनता आहे. आंदोलन करणारी लोक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत स्थानिक लोक आहेत, हे लक्षात घ्या असा इशारा ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाला मी आव्हान दिलं होतं की हा प्रकल्प तीन ते चार लाख कोटी रुपयांचा प्रकल्प येतोय. लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. तर मग तुम्ही खुलेआम चर्चा घडवा. मी स्वतः तिथे येतो. लोकांना कशा नोकऱ्या देणार हे तुम्ही सांगा, कोकणचे अर्थकारण कसं बदलणार हे तुम्ही सांगा. हिम्मत असेल तर येऊन जाहीर व्यासपीठावर सांगा, मी स्वतः तिथं येतो, असे आव्हान जाधव यांनी सरकारला दिले आहे.
पोलीस बळाचा वापर करु नका, बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा - अजित पवार
वारंवार बोलूनदेखील त्यांनी असं केलेले नाही. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेची ठाम आहे. शिवसेनेची अजून देखील भूमिका ठाम आहे. जे जनतेला पाहिजे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका कधीच बदललेली नाही, आम्ही जनतेसोबत राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. नाणारला होणारा प्रकल्प कोणाच्या सहीने रद्द झाला तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने रद्द झाला. जर कोकणातल्या प्रकल्पाविषयी प्रेम होतं तर रद्द का केलात, असा सवालही जाधव यांनी केली.
बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल - उदय सामंत
मी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत ऐकलं होत की प्रकल्प लवकर व्हावा म्हणून केंद्र आग्रह करत होते, म्हणून बारसूच्या जागेविषयी पत्र लिहलं होते. बारसूची जागा प्रकल्पाविषयी उद्धव ठाकरे यांनी सूचवली होती. यांचा अर्थ त्यांनी भूमिका बदलली आहे, असं नाही. सरकार तिथे जाऊन सरकार योग्य माहिती देण्याचे धाडस का करत नाही. आमचं अजूनही म्हणणं आहे की लोकांना सोबत घेऊन खुल्या मंचावर चर्चा करावी. जर हा प्रकल्प हिताचा आहे तर लोक का विरोध करतायत याचा विचार सरकारने करायला हवा, असेही भास्कर जाधव म्हणाले.
कोकणात प्रकल्प आले पाहिजेत. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. मात्र विनाशकारी प्रकल्प नको, कल्याणकारी प्रकल्प हवेत, अशी मनसेनी बारसू प्रकल्पावर आपली भूमिका मांडली आहे. लोकांना विश्वासात घेऊन सरकारने कुठलेही प्रकल्प आणले पाहिजेत. लोकांची मतमतांतर सरकारने समजून घेतली पाहिजेत. शिवसेनेचे खासदार विरोध करतात आणि स्थानिक आमदार पाठिंबा देतात ? शिवसेनेची (ठाकरे गट) नेमकी भूमिका काय? बारसू रिफायनरी प्रकल्प व्हावा अशा पद्धतीचे पत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देण्यात आले होते, असा मुद्दा मनसेने उपस्थित केला आहे.