close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आव्वाज खाली! गणेशोत्सवात वाद्य पथकांसाठी नियम कडक

पुणे पोलिसांनी ढोल ताशा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली

Updated: Sep 8, 2018, 11:08 AM IST
आव्वाज खाली! गणेशोत्सवात वाद्य पथकांसाठी नियम कडक

पुणे : पुण्यामध्ये गणेशोत्सवातील वाद्य पथकांची आचारसंहिता आणखी कडक करण्यात आलीय. यावर्षी मिरवणुकीत पथकातील वादकांची संख्या ५२ पेक्षा जास्त असणार नाही. त्याचप्रमाणे मानाच्या गणपतींसमोर केवळ तीन तर इतर मंडळांच्या गणपतीसमोर केवळ दोन पथकांना वादनाची परवानगी असणार आहे. पुणे पोलिसांनी या मर्यादा घालून दिल्या आहेत. 

ढोल ताशांचं वादन हे पुण्यातील गणेशोत्सवाचं खास वैशिष्टय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मिरवणुकीला लागणारा अधिक वेळ तसेच मिरवणुकी दरम्यान होणारं ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन ढोल ताशा पथकांसाठी आचारसंहिता बनवण्यात आलीय. 

या संदर्भात गुरुवारी पुणे पोलिसांनी ढोल ताशा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्याचवेळी ही आचारसंहिता जारी करण्यात आली. 

असं असलं तरी ढोल ताशा पथकांनी पोलिसांनी घालून दिलेल्या मर्यादेला सहमती दर्शविलेली नाही. पुढील बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होईल असं ढोल ताशा महासंघानं म्हटलंय.