साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा गजाआड

 साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा संशयित सुरज बागुल याला अटक करण्यात आलीय. 

Updated: Aug 26, 2018, 12:40 PM IST
साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा गजाआड  title=

नाशिक : नाशिकरोड परीसरातील साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा संशयित सुरज बागुल याला अटक करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या उपनगरात असलेले साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची नोंद उपनगर पोलिसांत मंदीराच्या ट्रस्टीनी केली होती. यावरून उपनगर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला होता.

सीसीटीव्हीत कैद 

 चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे संशयित सुरज बागुल याला अटक केलीय. मात्र सुरज याचा सूत्रधार अजूनही पोलिसांच्या ताब्यात मिळालेला नाही.

दानपेट्यांकडे लक्ष  

 दरम्यान नाशिकमधील चोरीच्या घटनांचा आलेख उंचावत असतांना चोरट्यांनी घरफोडयांबरोबर मंदिरातील दानपेट्यांकडे लक्ष केंद्रित केल्याचे समोर आलंय.