चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 374 वा वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज मोठ्या भक्तिमय वातावरणात देहू मध्ये संपन्न होत आहे. इंद्रायणीकाठी वारक-यांचा मेळा भरला आहे. राज्यभरातून दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत.
मुख्यमंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. श्री संत तुकाराम महाराज बीज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात होत आहे. कोरोनामुळे गेली 2 वर्ष तुकाराम महाराज बीज सोहळा साधेपणानं होत होता.
देहूनंतर डोर्लेवाडी गावात तुकाराम महाराज बीज सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यंदा या सोहळ्याचे 63 वे वर्ष आहे. तुकाराम महाराज बीज दुपारी बारा वाजता असल्याने वारकऱ्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे या साठी यात्रा कमिटीच्या वतीने मंदिर परिसरात सुमारे सत्तर हजार स्केअर फुटाचा मंडप उभारण्यात आला होता.
का साजरा केला जातो श्री संत तुकराम बीज?
श्री संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा हा दिवस होता असं सांगितलं जातं. त्यानंतर हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी तुकोबांच्या गाथेचं पारायण केलं जातं.