Sambhajinagar : डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; बाईकवरुन जाताना टॅंकने चिरडले

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मृत्यू झालेली तरुणी अवघ्या 23 वर्षांची होती. या अपघतात तरुणीचे वडील जखमी झाले आहेत

आकाश नेटके | Updated: Apr 3, 2023, 05:40 PM IST
Sambhajinagar : डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; बाईकवरुन जाताना टॅंकने चिरडले title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (chhatrapati sambhaji nagar) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात (sambhaji nagar accident) डॉक्टर तरुणीला जीव गमवावा लागला आहे. वडिलांसोबत जात असताना डॉक्टर तरुणीचा हा अपघात झाला. तरुणी थेट टॅंकरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. डॉक्टर तरुणीच्या मृत्यून संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 दिशा मधुकर काळे असे 23 वर्षीय तरुणीचे नाव असल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी दिशा आपल्या वडिलांसह बाईकवरुन जात होती. बाबा पेट्रोप पंप चौकात टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने दिशाचा मृत्यू झाला. तर बाईकवरसोबत असलेले दिशाचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत.

कल्याणमध्ये अपघात एक ठार तर तीन जखमी

कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संबंधित घटनेचा पंचनामा केला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गेल्या तीन महिन्यामधील या रस्त्यावरील हा पाचवा अपघात असून केडीएमसी आणि एमएमआरडीकडे स्पीड ब्रेकरची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. दरम्यान खडकपाडा पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत.

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

दुसरीकडे भंडारा येथून कामावरुन तुमसर येथे घरी जात असलेल्या दुचाकीस्वारास भरधाव जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्हाच्या तुमसर- मोहाडी राज्यमार्गावर खरबी शिवारात घडली आहे. मदन तारे (40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तुमसर येथील मदन तारे हे भंडारा येथील जैन डेरी येथे कामाले होते. रोजच्या प्रमाणे मदन तारे हे मोटारसायकलने रोजच्या प्रमाणे कामावर आले होते. रात्री काम आटोपून तुमसर येथे घरी जात असताना खरबी शिवारात मागून येणाऱ्या  एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार मदन यांचा गाडीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मोहाडी पोलीसांना मिळताच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरता मोहाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.