आदित्यपाठोपाठ तेजस ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर, उद्धव म्हणतात...

आणखी एक ठाकरे राजकारणात येणार?

Updated: Oct 9, 2019, 06:40 PM IST
आदित्यपाठोपाठ तेजस ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर, उद्धव म्हणतात... title=

संगमनेर : आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात असताना आणखी एक ठाकरे राजकारणात येणार की काय? याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे हा बाबा आणि भावाबरोबर दिसू लागला आहे.

आदित्य ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली त्यावेळी 'हीच ती वेळ' साधत तेजसही व्यासपीठावर दिसले. नंतर उमेदवारी अर्ज भरतानाही भावाची भावाला साथ होती.  उद्धव ठाकरेंच्या संगमनेरमधल्या सभेत तेजसना व्यासपीठावर येण्याचा आग्रह केला आणि मग तेजस ठाकरेंचं स्वागत 'कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला', या घोषणांच्या साथीनं झालं.

तेजस फक्त सभा पाहायला आलाय, तो जंगलात रमणारा आहे, असं उद्धव ठाकरेंनी लगेच स्पष्ट करुन टाकलं. तेजस ठाकरे सध्या तरी पर्यावरण आणि वन्यजीवांमध्ये रमणारे आहेत. पण राजकारणात कधीही काहीही घडूच शकतं. आणि खरं तर हीच आमची खरी शिवसेना, असं बाळासाहेब तेजसबद्दल म्हणायचे, त्याची यानिमित्तानं आठवण झाली.