संजय राठोड यांनी आरोप फेटाळले, म्हणाले करिअर संपवण्याचा विरोधकांचा डाव

राजकीय करिअर (political career) संपवण्यासाठी विरोधकांचा डाव आहे. माजी मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आरोप फेटाळले आहेत. 

Updated: Aug 13, 2021, 01:27 PM IST
संजय राठोड यांनी आरोप फेटाळले, म्हणाले करिअर संपवण्याचा विरोधकांचा डाव     title=

यवतमाळ : राजकीय करिअर (political career) संपवण्यासाठी विरोधकांचा डाव आहे. माजी मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आरोप फेटाळले आहेत. महिलेनं शरीरसुखाची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दरम्यान, आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध पुन्हा एका महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. शिवाय या संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील गंभीर आरोप केले. 

या सर्व आरोपांना संजय राठोड यांनी बिनबुडाचे ठरविले आहे. त्यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देताना घाणेरड्या आरोपातून माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. राठोड यांच्या शैक्षणिक संस्थेतील एका शिक्षकाला तक्रारीमुळे नियुक्तीवरून बाजूला व्हावे लागल्याने सध्याच्या तथ्यहीन तक्रारी आहे. या आधीच्या फेब्रुवारी महिन्यातील प्रकरणामुळे संधी साधत मला अडचणीत आणण्यासाठी नव्याने आरोप केले जात आहेत. वास्तविक पाहता मलाच अनोळखी मोबाईल नंबरवरून माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याच्या धमक्या आल्या आहेत.

तत्पूर्वी माझ्या नावाचे साधर्म्य असल्याने संस्थेतील सहकारी कर्मचारी संजय जयस्वाल यांना देखील धमक्यांचे मॅसेज आले आहेत. याबाबत त्यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात 24 मे रोजी तक्रार नोंदवली आहे तर त्यानंतर आपल्याला देखील वेगवेगळ्या 5 मोबाईल क्रमांकावरून धमक्यांचे मॅसेज आले. ज्यात माझे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याबाबत म्हटले आहे. राजकीय विरोधक माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी कट रचत आहे. मी सर्वसामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता असल्याने माझा राजकीय प्रवास संपविण्यासाठी हा कट आहे. मात्र मी माझी रेषा आखली आहे ती पुसून कुणी मोठं होऊ शकत नाही, असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.

आपल्याला आलेल्या धमक्यांबाबत 28 जुलैला अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ज्या 5 मोबाईल क्रमांकावरून धमक्या आल्या त्याची चौकशी पोलिसांकडून व्हावी तेव्हा सत्य पुढे येईल अशी मागणी आमदार संजय राठोड यांनी केली आहे.