पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राठोड हात जोडून काय म्हणाले?

पोहरादेवी मंदिरात काय म्हणाले संजय राठोड 

Updated: Feb 23, 2021, 02:11 PM IST
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राठोड हात जोडून काय म्हणाले?

वाशिम : 'माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे', अशी पहिली प्रतिक्रिया वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod First Reaction on Pooja Chavan Suicide Case) यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर दिली आहे. वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मौन सोडलं आहे. 

संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं; काय म्हणाले? 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात घाणेरडं राजकारण झालं आहे.
माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला गेला.
माझी, कुटुंबियांची बदनामी थांबवा, अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
चौकशीतून सत्य समोर येईल मला आज काही बोलायचं नाही, असं देखील यावेळी ते म्हणाले.
यापुढेही पूर्वीसारखं काम सुरूच राहणार, मी माझ्या मुंबईच्या घरातून काम करतंच होतं.
राजकारण चुकीचं आणि निराधारा असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले.
राठोड यांनी हात जोडून विनंती केली आहे की, माझी बदनामी थांबवा.
पोलिसांचा तपास सुरू आहे. सत्य लवकरच स्पष्ट होईल.
10 दिवसापासून मी मुंबईत होतो, तेथून काम सुरु होतं, माझं कुटूंब सांभाळत होतो. 
माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न
पुजा चव्हाण मृत्यूचं राजकारण हे घाणेरडं, चुकीचं आणि निराधार
मला एका घटनेमुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका
माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
चौकशीतून सत्य समोर येईल आता काहीही बोलायचं नाही.
पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचं सर्वांना दु:ख , त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.