'99.99 टक्के आरोपी म्हणतात'... वाल्मिक कराड चौकशी प्रकरणात बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक दावा

Walmik Karad :  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनावणे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच तपासाबाबत अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jan 2, 2025, 03:48 PM IST
'99.99 टक्के आरोपी म्हणतात'...  वाल्मिक कराड चौकशी प्रकरणात बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक दावा

Santosh Deshmukh Murder Case :  बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या संपर्कात कोण आहे, त्याला मदत  करणा-यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. वाल्मिक कराड इथून तिथून फिरताना पोलीस यंत्रणा काय करत होती, असं म्हणत त्यांनी पोलिसांवर टीका केलीय. तसंच या प्रकरणात SIT बनवली मात्र त्यात बीडमधलेच पोलीस नियुक्त केलेत. बाहेरचे का निवडले नाहीत, असा सवाल सोनावणेंनी विचारलाय. बीड जिल्ह्यात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.

कोणताही आरोपी 99.99 टक्के म्हणतात की हा गुन्हा केलेले नाही. गुन्हा दाखल झाला तेव्हा ते कुठे आहे. 12 ते 13 तारखेपर्यंत ते कुठे होते. 11 तारखेला गु्न्हा दाखल झाल्यापासून ते कोणा कोणाकोणाला भेटले. व्हिडिओ शेअर केल्यानंतर ते फक्त अर्ध्या तासात CID ऑफिसमध्ये पोहचले. बीडमधुन अर्धा तासात पुण्यात पोहचणे शक्य नाही.  शरणागती पासून CID चौकशी पर्यंत हे सर्व प्रकरण आणि तपास संशयास्पद वाटत आहे. या प्रकरणातील 3 प्रमुख संशयास्पद आरोपी का पकडले जात नाहीत. आरोपी पळून गेले आहेत. या आरोपींना पळून लावण्यासाठी पोलिस यंत्रणा का काम करत आहे? असा संशय देखील उपस्थित केला जात आहे.  काही विशिष्ट अधिकाराऱ्यांना पद नसताना देखील पद निर्माण गेवराईमध्ये नियुक्त करण्यात आले असा आरोप देखील बजरंग सोनावणे यांनी केला आहे. 

 सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली. याआधी जे वकील होते त्यांनी त्यांना सहकार्य करावं. याबाबतची ऑर्डर काढावी अशी मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उज्जवल निकम यांना फोन केला आणि विचारणा केली. 

सुरेश धस यांनी निवेदन दिले आहे.  या अनुषंगाने उज्वल निकम यांची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातील . या संदर्भात  उज्वल निकम यांना पत्र पाठवण्यात आवले आहे. अतिरीक्त पोलिस कुमक जिल्ह्यात मागवण्यात आली आहे. यामुळे बीडमध्ये अतिरिक्त पलंग मागवण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.