कोल्हापूर : Sanjay Raut has congratulated Nawab Malik : महाविकासा आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी चांगले काम केले आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो, असे उद्गगार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काढले. ते म्हणाले, नवाब मलिक याचे कौतुक मी करतोय, राष्ट्रवादीने केलं की नाही हे माहिती नाही. आज देखील केंद्रीय तपास यंत्रणा ह्या दबावाखाली काम करत आहेत, असा त्यांनी आरोप केला.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान याला मोठा दिलासा मिळाला. याप्रकरणात त्याला क्लिन चीट देण्यात आली आहे. आर्यनला ऑक्टोबर 2021 च्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक न्यायालयीन सुनावणीनंतर 28 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. आता त्याला क्लिन चीट मिळाली. याप्रकरणात नवाब मलिक यांनी आवाज उठवला होता. ही फर्जी कारवाई आहे, असे मलिक यांनी वेळोवेळी सांगितले होते. त्यानंतर सत्य समोर आले आहे. मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली आहे. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.
दरम्यान, आर्यनला क्लिनचीट मिळाल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सॉरी असं म्हटलं. 'मी आता एनसीबीमध्ये नाही, त्यामुळे या विषयावर बोलू शकत नाही. यासाठी तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आर्यन खानला 28 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. या प्रकरणात आर्यन खानसह सहा जणांविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. सुरुवातीच्या प्रकरणात काही उणिवा आढळून आल्या आणि पहिल्या तपास पथकाकडून चुका झाल्याचं एनसीबीने मान्य केले.