MVA Morcha Mumbai : शिंदे- फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य!

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार याचा मुहूर्त सांगितलं आहे.

Updated: Dec 17, 2022, 02:50 PM IST
 MVA Morcha Mumbai : शिंदे- फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य!  title=

Sanjay Raut in MVA Morcha : महाविकास आघाडीने महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानाच्या निषेधार्थ मुंबईमध्ये आज भव्य विराट मोर्चाचं (Maha Vikas Aghadi Morcha) आयोजन करण्यात आलं आहे. सर्व नेते पोहोचले असून भाषणांना सुरूवात झाली आहे. भाषणादरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार याचा मुहूर्त सांगितला आहे. यावेळी बोलताना संजय राऊतांनी (SanjayRaut) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरूनही सरकारवर ताशेरे ओढले आहेत. (Sanjay Raut on Shinde Fadnavis Goverment)

Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीचा मोर्चा कशासाठी?

या मोर्चाने इशारा दिला आहे, शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही. दिल्लीही दुर्बिणीतून बघत असेल की महाराष्ट्राची ताकद काय आहे. आज महाराष्ट्र पेटलाय. ही ठिणगी पडली आहे. या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा, डॉ. आंबेडकरांचा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? असा सवाल करत राऊतांनी टीका केली आहे.