पुण्यातील वेदभवनात अभिनव उपक्रम; संस्कृतप्रधान बालवाडीतून विद्यार्थ्यांना भाषेचे धडे

पुण्यातील वेदपाठशाळेने 'संस्कृतप्रधान बालवाडी' या उपक्रमाची सुरूवात केली आहे

Updated: Mar 19, 2021, 03:40 PM IST
पुण्यातील वेदभवनात अभिनव उपक्रम; संस्कृतप्रधान बालवाडीतून विद्यार्थ्यांना भाषेचे धडे title=

पुणे : लहान विद्यार्थ्यांचे उच्चार सुस्पष्ट आणि निर्दोष असावेत या हेतून पुण्यातील वेदपाठशाळेने 'संस्कृतप्रधान बालवाडी' या उपक्रमाची सुरूवात केली आहे. पुण्यातील वेदभवनच्या वास्तूत ही संस्कृतप्रधान बालवाडी सुरू होत आहे. तीन ते पाच वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना या बालवाडी वर्गाला प्रवेश घेता येणार आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ईटीएचडीसी तसेच पुण्यातील वेदमुर्ती मोरेश्वर घैसास ( moreshwar ghaisas ) यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही बालवाडी सुरू होत आहे. संस्कृत प्रधान बालवाडीच्या ( sankrutpradhan balwadi )  बोधचिन्हाचे अनावरण जेष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर ( vijay bhatakar ) यांच्या हस्ते करण्यात आले.

बालवाडीचे वर्ग जून महिण्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बहुदा हे वर्ग सुरू करण्यात अनिश्चितता आहे. तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून पुढील निर्णय घेण्यात येणार असे वेदमूर्ती घैसास गुरूजी यांनी सांगितले. या  बालवाडीचा कार्यकाळ दोन वर्षे इतका असणार आहे.

आपल्या भाषांच्या अभ्यासासाठी   सुरूवातीपासून श्रवणाचे संस्कार महत्वाचे ठरतात, त्यामुळे संस्कृतप्रधान बालवाडी ही अभिवनव संकल्पना सुरू करण्यात आली  आहे. मुलांचे उच्चार निर्दोष होती.  वाणी स्पष्ट होईल. या वर्गातून भविष्यातील अभ्यासक आणि संशोधक घडतील असे डॉ. भटकर यावेळी म्हणाले.

कसा असेल हा संस्कृतप्रधान वर्ग

पहिल्यावर्षी या श्रवण संस्कार, संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या भाषांची तोंडओळख असेन. तर दुसऱ्या वर्षी तिन्ही भाषांच्या श्रवणाबरोबर पाठांतर, उच्चार यावर भर दिला जाणार आहे.

संस्कृतप्रधान या अभिनव संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना भाषाविषयीचे प्रेम निर्माण होण्यास मदत होईल. उच्चार आणि वाणीतील स्पष्टतेमुळे व्यक्तीमत्व विकास होईल असे वेदमुर्ती घैसास गुरूजींनी म्हटले आहे