संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; पहाटे पासून मंदिरात काकड आरती आणि महापूजेने सुरुवात

dehu palkhi schedule 2022 | Ashadhi Wari | dehu 2022 | संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी देहू देवस्थानने केली आहे. 

Updated: Jun 20, 2022, 08:54 AM IST
संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; पहाटे पासून मंदिरात काकड आरती आणि महापूजेने सुरुवात title=

चैत्राली राजापूरकर, देहू : संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी देहू देवस्थानने केली आहे. आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिर इथे अभिषेक झाला. त्यानंतर  पहाटे पाच वाजता अभिषेक महापुजा करून पांडुरंगाची आरती करण्यात आली. अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली..यावेळी विठ्ठल रूक्मिणीचं सुंदर मनमोहक रूपं दिसत होते..

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा 337 वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होणार आहे. 

आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिर येथे अभिषेक झाला. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक व काकड़ आरती करून सुरुवात करण्यात आली. 

स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजे नंतर पालखी सोहळयाचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादूकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.

आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सोहळा 

असे असणार आजचे कार्यक्रम

1) सकाळी पाच वाजता महापूजा

2) सहा वाजता वैकुंठ मंदिरात पूजा .
3) सात वाजता नारायण महाराज यांच्या समाधीची विश्वस्तांच्या हस्ते महापूजा.

4) सकाळी नऊ ते अकरा संत तुकाराम महाराज यांच्या पादुका चे पूजन.
5) दहा ते बारा वाजता रमदास महाराज मोरे यांचे कीर्तन.

6) दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा.
7) पाच वाजता पालखी प्रदीक्षना .

8) सायंकाळी सहा वाजता पालखी इनामदार वाड्यात मुक्काम.
9) रात्री नऊ वाजता किर्तन जागर.