Sarswati Sadhana : अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मात अनेक कठोर चालीरिती आहेत. जैन धर्मातील जैन मुली अनेक कठिण साधना देखील करतात. यापैकीच एक आहे ती सरस्वती साधना. ही साधना केल्यानंतर विद्यार्थी कठिण परिक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. जैन धर्मातील प्रसिद्ध धर्मगुरू आणि अवघ्या 12 व्या वर्षी संन्यास दीक्षा घेणारे जैन मुनि अजितचंद्र सागर महाराज यांनी सरस्वती साधनेचा शोध लावला. जैन मुनि अजितचंद्र सागर या साधनेच्या माध्यमातून विश्वविक्रम रचणार आहेत.
सरस्वती साधनेचा शोध लावणारे जैन मुनि अजितचंद्र सागर यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. जैन मुनि अजितचंद्र सागर यांनी तब्बल 8 वर्ष मौन व्रत धारण केलं होतं. त्यांना 23 आगमांच्या 22 हजार गाथा तोंडपाठ आहेत. अभ्यासू, तत्त्वज्ञानाचा अचूक निष्कर्ष काढणारे मुनि म्हणूनही त्यांचा विशेष उल्लेख केला जातो.
जैन मुनि अजितचंद्र सागर यांचा अनोखा विक्रम
जैन मुनि अजितचंद्र सागर यांचा अनोखा विक्रम रचला होता. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये 3000 प्रेक्षकांच्या समोर त्यांनी 200 अवधान केला होता. अवधान हा ध्यानाचा एक प्रकार आहे तसेच मुंबईच्या एनएससीआय स्टेडियममध्ये हजारो लोकांच्या समोर 500 अवधानाचा विक्रम देखील त्यांनी रचला होता. महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशांसह 15 उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही हा विक्रम प्रत्यक्षात पाहण्यासाठी उपस्थित होते. नयनचंद्रसागर सुरीश्वरजी महाराज हे अजितचंद्र सागर हे त्यांचे गुरु होते. वयाच्या 19 व्या वर्षी अजितचंद्र सागर यांनी आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली आत्मविश्वासाचा अद्भुत चमत्कार दाखवला. अजितचंद्र सागर यांनी याआधी 1500 प्रेक्षकांसमोर 100 अवधान केले. यावेळी उपस्थितांपैकी 100 लोकांनी त्यांना गोष्टी सांगितल्या. 100 गोष्टी काहीही न लिहिता लक्षात ठेवल्या यानंतर त्या सर्व गोष्टी त्यांनी त्याच क्रमाने पुन्हा सांगितल्या. हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही.
सरस्वती साधना करणारे विद्यार्थी कठिण परिक्षेत उत्तीर्ण होतात असा दावा जैन मुनी करतात. जगभरातील 50 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी सरस्वती साधनेचा प्रयत्न केला. या साधनेला सहस्त्रावधान असेही म्हणतात. या साधनेत विद्यार्थी वेगवेगळ्या श्रेणीतील आणि प्रत्येक वर्गातील लोकांनी सांगितलेल्या 1000 गोष्टी किंवा प्रश्न आणि उत्तरे लक्षात ठेवतात. यानंतर त्याच क्रमाने पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतात. 1 मे 2024 रोजी मुंबईतील वरळी एनएससीआय स्टेडियमवर हजारो लोकांच्या उपस्थितीत जैन मुनि अजितचंद्र सागर या विक्रमाची पुनरावृत्ती करणार आहेत.