संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मुंडे म्हणाले, 'क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे...'

Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणामधील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळेचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी गंभीर विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 28, 2025, 01:37 PM IST
संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मुंडे म्हणाले, 'क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे...' title=
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप (प्रातिनिधिक फोटो)

Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case: आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अजून सापडलेला नसल्याच्या मुद्द्यावरुन संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळेबरोबर घातपात झाल्याची शक्यताही व्यक्त केली आहे. या टीकेला स्वत: धनंजय मुंडेंनी उत्तर दिलं आहे. पत्रकारांशी बोलताना मुंडेंनी क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचेच संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

क्षीरसागरांच्या मागणीवर मुंडे काय म्हणाले?

"कृष्णा आंधळे अजून सापडत नाही. त्याच्याबाबतीत घातपात झालेला असू शकतो. एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो. हा बीडचा इतिहास आहे. मला वाटतं नाही हा माणूस सापडेल," असं विधान संदीप क्षीरसागर यांनी केलं. तसेच फरार असलेल्या कृष्णा आंधळेबद्दल बोलताना, "एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवले तर 24 तासात सापडतो. त्याच्या जीवाशी घातपात झाला असावा," असंही क्षीरसागर म्हणाले. क्षीरसागर यांनी केलेल्या या दाव्यावरुन  यावर बोलताना धनंजय मुंडेंनी "एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहित असेल, इतर कोणाकोणाला अजून काही माहिती असेल तर मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपींचे कुठेतरी आता संबंध आहेत. ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना कशी मिळू शकते. त्या कृष्णाला काय झालं आहे त्याची अजून पोलिसांना माहिती नाही, तुम्हा-आम्हाला माहिती नाही. तुमचे एवढे मायक्रो कॅमेरा आहेत त्यांना माहिती नाही तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्याचा आणि त्यांचा कुठेतरी संबंध आहे. त्या संबंधातून अशा बातम्या पेरायच्या. या बातम्या आपल्याला मिळतात," असं म्हटलं.

संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना...

तसेच धनंजय मुंडेंनी पहिल्या दिवशी आपण जी मागणी केलेली ती कायम आहे, असंही सांगितलं. "गेला महिना-सव्वा महिना बीड पलिकडे माध्यमांमध्ये काहीही चालू नाहीये. माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. माध्यमांच्याबाबतीत संबंध बीड जिल्ह्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान, आदर आणि रुदबा आहे तो कुठे तरी कमी होत आहे. पहिल्यांदा आपण सुद्धा पत्रकार म्हणून काय खरं काय खोटं याची तपासणी करावी. एक जिल्हा, तेथील नेता असेल किंवा मतदारसंघ असेल भलेही मी असेल त्यावर मिडिया ट्रायल केली पाहिजे त्यांना शिक्षा केली पाहिजे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन फासावर घातलं पाहिजे या माझ्या पहिल्या दिवसाच्या भूमिकेत आणि आताच्या भूमिकेत काहीही बदल नाही,"

दादा राजीनामा घेतील; क्षीरसागारांना विश्वास

संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं म्हटलं आहे. "दादांचा स्वभाव आहे की चुकीची गोष्ट दादांना पटत नाही. त्यामुळं ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा आहे. कारण सरकारने एसपी बदलल्यावर अवैध धंद्यांवर कारवाई होतं आहे," असं क्षीरसागर म्हणाले. तसेच, "प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचं असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा," असंही क्षीरसागर म्हणाले आहेत. मात्र राजीनाम्यासंदर्भात बोलताना धनंजय मुंडेंनी, "मी राजीनाम्याच्या मागणीबद्दल काहीही बोलणार नाही. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच बोलतील," असं म्हटलं. 

सीडीआर मिळेल तेव्हा कारवाई होईल

क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, "गुन्हा नोंद करायला दहा-बारा तास उशीर झाला. ज्यांनी गुन्हा दाखल करायला उशीर केला त्यांचा सीडीआर मिळेल तेव्हा यांच्यावर कारवाई होईल," असंही म्हटलं. "ज्यांच्यावर यापूर्वी अन्याय झाला ते लोक पुढे येऊन बोलत आहेत. लोक रस्त्यावर स्वतःहून उतरत आहेत. अनेक लोकांसोबत घडलं आहे ते पुढे येत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x