साताऱ्यात काँग्रेसला दे धक्का, रणजित नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Updated: Mar 23, 2019, 07:54 PM IST
साताऱ्यात काँग्रेसला दे धक्का, रणजित नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर title=

सातारा : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. नाईक निंबाळकर हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे हा त्यांच्यासाठीही मोठा धक्का असणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांच्यानंतर साताऱ्यात आणखी एक काँग्रेस नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.

काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसलाच हात दाखवत भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला आहे. काही तासांतच ते कमळ हाती घेणार असून माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ते माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव असून ते बराच काळ काँग्रेसमध्ये कार्यरत होते.