सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषद सभापती यांच्यातील वाद आता आणखीन वाढलाय. खासदार उदयनराजे यांनी फलटणमध्ये जाऊन रामराजे नाईक निंबाळकर यांना खुलं आव्हान दिलं.. उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरत रामराजे यांच्यावर टीका केली. उदयनराजेंनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरही निशाणा साधलाय. आपण नसतो तर सातारा जिल्ह्यातील सर्व ऑफिसेस कराड आणि बारामतीला पळवली असती असा आरोपही उदयनराजेंनी केला होता.
प्रत्येक जिल्हयात संघटीतपणा दिसून येतो पण सातारा जिल्हयात मात्र कोणीही यावं आणि टपली मारुन जाव, अशी अवस्था सातारा जिल्हयाची झाली असून मी नसतो तर सातारा जिल्हयातील सर्व ऑफिस या बांडगुळांनी बारामती आणि कराडला पळवली असती, अशी घणघणाती टीका करत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खा. उदयनराजे भोसले यांनी केली होती. स्पर्धा असावी तर कामाशी अशा शब्दांत शिवेंद्रराजेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.