close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

उदयनराजेंचं न्यायालय-पोलिसांना थेट आव्हान, डॉल्बी लावण्यावर ठाम

खासदार उदयनराजे भोसलेंनी न्यायालय आणि पोलिसांना खुलं आव्हान दिलं आहे.

Updated: Sep 10, 2018, 10:58 PM IST
उदयनराजेंचं न्यायालय-पोलिसांना थेट आव्हान, डॉल्बी लावण्यावर ठाम

सातारा : खासदार उदयनराजे भोसलेंनी न्यायालय आणि पोलिसांना खुलं आव्हान देत डॉल्बी लावणारच असा सज्जड दम भरलाय. सातारा शहरातील एका मंडलाच्या गणपती आगमनावेळी ते स्टेजवर बोलत होते. बोलताना त्यांनी कायद्याची चौकट न पाळ्याचा कार्यकर्त्यांना जणू संदेशच दिला. उदयनराजेंच्या या चिथावणीखोर भाषणावर आता पोलीस खाते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  (व्हिडिओ सर्वात खाली पाहा)

दरम्यान उदयन राजेंच्या या आव्हानानंतर पोलीस ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी ला परवानगी दिली जाणार नाही, असं  कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी स्पष्ट केलंय.