Nagnath Kotapalle Died : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन

नागनाथ कोतापल्ले (Nagnath Kotapalle) यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

Updated: Nov 30, 2022, 04:36 PM IST
 Nagnath Kotapalle Died : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन title=

Pune News : साहित्य क्षेत्रातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोतापल्ले (Nagnath Kotapalle Died) यांचं उपचारादरम्यान निधन झालंय. त्यांच्यावर पुण्यातील (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. जीवन-मृत्यूशी त्यांची झुंज सुरु होती. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (senior writer dr nagnath kotapalle passes away in pune latest marathi news)

नागनाथ कोतापल्ले यांना तब्येत स्थिर नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तब्येत साथ देत नव्हती. अखेर नागनाथ कोतापल्ले यांची वयाच्या 74 व्या वर्षी प्राणज्योत माळवली. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राचं कधीही न भरुन निघणारं नुकसान झालंय. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून आणि नातवंडं असा परिवार आहे.

कारकीर्द 

कोतापल्ले यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी हे प्राध्यापक ते कुलुगुरु अशी राहिलीय. नागनाथ कोतापल्ले 1977 साली मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक झाले. यांनतर कोतापल्ले यांची पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली. कोतापल्ले 2005-2010 या दरम्यान मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपदी राहिले.

तसेच विविध संस्थेत महत्त्वाच्यी पदं त्यांनी भूषवली.  साहित्य अकादमी, नॅक, राज्य मराठी विकास संस्था, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली.

अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

कोतापल्ले यांनी विविध संमेलनचे अध्यक्ष राहिले. श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन,  मुंबईतले युवक साहित्य संमेलन, कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन या आणि अशा बऱ्याचं साहित्य संमेलनाची अध्यक्षंपद भूषवली. चिपळूणला 2012 साली 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं. कोतापल्ले या संमेलनाचे अध्यक्ष होते.

मिळालेले पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ
मूड्स (१९७६)
संदर्भ (१९८४)
गांधारीचे डोळे (१९८५)
ग्रामीण साहित्य (१९८५)
उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
'ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध'साठी परिमल पुरस्कार (१९८५)
'ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)
दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
'राख आणि पाऊस'साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
'राख आणि पाऊस'साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
'साहित्य अवकाश'साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार