शरद पवारांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही...

   राज ठाकरे यांनी मुलाखतीत शरद पवार यांना रॅपीड फायर प्रश्न विचाराला सुरूवात केली. पण रॅपीड फायरच्या पहिल्याच प्रश्नावर शरद पवार यांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 21, 2018, 09:15 PM IST
 शरद पवारांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही...  title=

पुणे :   राज ठाकरे यांनी मुलाखतीत शरद पवार यांना रॅपीड फायर प्रश्न विचाराला सुरूवात केली. पण रॅपीड फायरच्या पहिल्याच प्रश्नावर शरद पवार यांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही. 

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन 'शोध मराठी मनाचा' या मालिकेअंतर्गत करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली.  दीर्घ प्रश्नावली झाल्यावर राज ठाकरे रॅपीड फायरकडे वळत असताना हा प्रकार घडला. 

 

राज ठाकरे यांनी रॅपीड फायरमधील पहिला प्रश्न विचारला इंदिरा गांधी की यशवंतराव चव्हाण.... त्यावर शरद पवार यांनी दोघांपैकी एकाची निवड न करता सविस्तर उत्तर देत राज ठाकरेंना मध्येच थांबविले.  ते म्हणाले, याचं उत्तर एका वाक्यात देण्यासारख नाही.  त्यानंतर पवारांनी इंदिरा गांधीची महती सांगितली.