शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीत 7 नावांची घोषणा; कोण आहेत हे 'पॉवर'फूल उमेदवार

Sharad Pawar NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 28, 2024, 04:46 PM IST
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीत 7 नावांची घोषणा; कोण आहेत हे 'पॉवर'फूल उमेदवार

Sharad Pawar NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने एक्सवर पोस्ट शेअर करत या उमेदवारांची माहिती दिली आहे. या यादीत वाईमधून अरुणा देवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासह शरद पवारांच्या उमेदवार यादीत 12 महिला झाल्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी

1) माण -  प्रभारक घार्गे  
2) काटोल - सलिल देशमुख
3) वाई  - अरुना देवी पिसाळ 
4) दौंड - रमेश थोरात   
5) पुसद - शरद मैंद 
6) शिंदखेडा  -  संदीप बेनसे  
7) खानापुर वैभव पाटील

दरम्यान रविवारी जयंत पाटील यांनी पक्षाची तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये 9 उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी खालीलप्रमाणे -

1. करंजा - ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट - अतुल वांदिले
3. हिंगणा - रमेश बंग
4. अणुशक्तीनगर - फहाद अहमद
5. चिंचवड - राहुल कलाटे
6. भोसरी - अजित गव्हाणे
7. माजलगाव - मोहन बाजीराव जगताप  
8. परळी - राजेसाहेब देशमुख 
9. मोहोळ - सिद्धी रमेश कदम

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More