मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली 'चाय पे खर्चा', पवारांचा चिमटा

मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या चहापानावरील खर्चावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जोरदार चिमटा काढलाय. आपण मुख्यमंत्री असताना चहापानावर एवढा खर्च होत नव्हता, असं पवार म्हणाले. 

Updated: Mar 29, 2018, 03:28 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली 'चाय पे खर्चा', पवारांचा चिमटा  title=

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या चहापानावरील खर्चावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जोरदार चिमटा काढलाय. आपण मुख्यमंत्री असताना चहापानावर एवढा खर्च होत नव्हता, असं पवार म्हणाले. 

'मी टीव्हीवर बातमी पाहत होतो... चहापानाला किती खर्च किती होतो... मी चार वेळा मुख्यमंत्री होतो... मला चहापान कधी जाणवलं नाही... प्रशासकीय खर्चामध्ये कपात करावी पण जिथे नवी पिढी घडवायची आहे तिथे कपातीचा विचार करू नये' असं म्हणत पवारांनी फडणवीस सरकारला जोरदार चपराक लगावलीय.  

मुख्यमंत्री कार्यालयात चाय पे केवळ 'चर्चा'च नाहीत... तर जोरदार 'खर्चा' होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी आकडेवारीसह केला होता. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री कार्यालयात केवळ चहापानावर ३ कोटी ३४ लाख ६४ हजार ९०५ रूपये खर्च झाल्याचं त्यांनी सांगितलं. एवढा चहा कोणी पिऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली सुरू असलेल्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणीही निरूपम यांनी केलीय.