अखेर, 'जाई'नंही प्राण सोडले!

काही दिवसांपूर्वी पिंजऱ्यात असतानाच 'जाई'ला साप चावला होता.  

Updated: Mar 29, 2018, 10:14 AM IST
अखेर, 'जाई'नंही प्राण सोडले! title=
प्रातिनिधिक फोटो

नागपूर : महाराजबाग प्राणी संग्रहालयात गेल्या दहा वर्षांपासून असलेल्या 'जाई' नावाच्या वाघिणीचा मृत्यू झालाय. काही दिवसांपूर्वी पिंजऱ्यात असतानाच 'जाई'ला साप चावला होता. त्यामुळे तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तीन महिन्यांच्या उचारानंतर ती बरी झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा तिची प्रकृती खालावली होती, तिने खाणे-पिणे सोडले होते. अखेर आज पहाटे तिने प्राण सोडले.