शरद पवारांचा कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल! लेकीने दिलेल्या एका शब्दाच्या कॅप्शनची चर्चा

Sharad Pawar Viral Photo: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा फोटो व्हायरल होण्याचं कारण म्हणजे शरद पवार यांचा लूक आहे. कारण शरद पवार या फोटो चक्क फ्रेंच कट दाढीत (Sharad Pawar in French Cut) दिसत आहेत. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीच हा फोटो इन्स्टाग्रामला (Instagram) शेअर केला आहे.   

Updated: Mar 23, 2023, 03:28 PM IST
शरद पवारांचा कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल! लेकीने दिलेल्या एका शब्दाच्या कॅप्शनची चर्चा title=

Sharad Pawar Viral Photo: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे नाव महाराष्ट्रात चर्चेत असण्यासाठी काही कारण लागत नाही. कोणतंही राजकीय संकट निर्माण झालं असेल किंवा महाराष्ट्रासमोर एखादं आर्थिक संकट असेल किंवा एखादा प्रश्न असेल तर साहजिकपणे शरद पवारांचा उल्लेख केला जातो. पण सध्या शरद पवार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे शरद पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. शरद पवारांचा हा फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. 

शरद पवार हे नाव घेतल्यानंतर तुमच्या डोळ्यांसमोर नेहमीच्या लूकमध्ये असणारे पवार समोर येतात. पण सोशल मीडियावर शरद पवारांचा एक असा फोटो व्हायरल झाला आहे जो लूक तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. या फोटो शरद पवार चक्क फ्रेंच कट दाढीत दिसत आहेत. शरद पवारांचा या लूकवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. 

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचं वडीलप्रेम सर्वज्ञात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा वडिलांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळेच अनेकदा त्या शरद पवारांचे जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देत असतात. अशातच त्यांनी नुकताच शरद पवारांचा एक फोटो शेअर केला आहे. पण शरद पवारांचा हा फोटो त्यांच्या लूकमुळे चर्चेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

हा फोटो फार जुना असल्याचं दिसत आहे. कारण हा फोटो शरद पवारांच्या तरुणणातील आहे. हा फोटो एखाद्या कार्यक्रमातला दिसत असून शरद पवारांच्या बाजूला त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही बसलेल्या दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी 'नोस्टाल्जिया' अशी कॅप्शन दिली आहे. 

सुप्रिया सुळे यांनी शेअर केल्यानंतर या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका युजरने हे nostalgic नाही तर एक सरप्राइज आहे असं म्हटलं आहे. तर एका युजरने झकास अशी कमेंट करत लूकचं कौतुक केलं आहे. 

मग हा फोटो तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.