शरद पवार म्हणाले, मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं !

राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.  

Updated: Jan 22, 2021, 12:18 PM IST
शरद पवार म्हणाले, मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं !  title=

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. शेती कायदा विषयक बनवलेल्या समितीवर शेतकऱ्यांना (Farmers) विश्वास नाही. आम्ही शेतकरी आंदोलनाला (Farmers Agitating In Delhi) ताकद देणार आहोत. तसेच मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव दिल्यावर राज्यपाल यांनी कधी फेटाळला नाही, इथं मात्र दुसरंच काहीतरी दिसते, असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हाणताना भाजपला चिमटा काढला. तसेच कायदा आणि सुव्यवथा राज्याचा विषय आहे, त्यात केंद्र हस्तक्षेप करत नाही इथे केंद्र हस्तक्षेप करत आहे हे आश्चर्यकारक, असे पवार म्हणाले. यावेळी मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil,) यांच्या मुख्यमंत्री (Chief Minister) वक्तव्यावर सवाल करण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले, मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं !

'त्यात काही गैर नाही'

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यात काही गैर नाही, मला देखील उद्या मुख्यमंत्री व्हावं वाटते, असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा पाठराखण केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे मत व्यक्त केल आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत जी चर्चा केली होती त्यावेळी आम्हला वाटले होते, यात सत्यता पाहणे गरजेचं आहे. त्यावेळी आम्ही जो निष्कर्ष काढला होता तो बरोबर होता. हे आता दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटलंय. 

'त्यांना आता चांगली झोप लागेल'

कायदा आणि सुव्यवथा राज्याचा विषय आहे, त्यात केंद्र हस्तक्षेप करत नाही, इथे केंद्र हस्तक्षेप करत आहे हे आश्चर्यकारक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे. ज्यांना सुरक्षा पोहचवली आहे, त्यांनी केंद्राकडे सुरक्षा मिळावी म्हणून मागणी केली असेल, त्यामुळे किमान त्यांना आता चांगली झोप लागेल असा, टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

राज्यपाल यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

आजपर्यंतच्या इतिहासात केंद्राने कधी कोणाला सुरक्षा पोहोचवली नाही हे सांगायला देखील शरद पवार विसरले नाहीत. राज्यपाल नियुक्त आमदार संदर्भात बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी एकदा प्रस्ताव दिला की त्यांनतर राज्यपाल कधीही हा प्रस्ताव फेटाळला नाही, इथं मात्र दुसरंच काहीतरी दिसते असे सांगत अप्रत्यक्ष रित्या राज्यपाल यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.