शेअर रिक्षातून प्रवास करताय ? हे वाचाच

शेअर रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांना ठरवून टार्गेट करुन गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार 

Updated: Mar 3, 2020, 11:37 PM IST
शेअर रिक्षातून प्रवास करताय ? हे वाचाच title=

अमर काणे, झी २४ तास, नागपूर :  शेअर रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांना ठरवून टार्गेट करुन गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार नागपुरमधून समोर आला. दोन सख्ख्या जावांची टोळी हे कारस्थान करत होती. फिरोजा बेगम यी 26 फेब्रुवारीला इंदोरा परिसरातून नुरी कॉलनीला शेअरिंग रिक्षामधून जात होत्या. 

थोडं अंतर गेल्यावर रिक्षामधल्या एका महिला प्रवाशानं उलटी होत असल्याचं सांगितलं. त्या गडबडीत रिक्षा थांबली, फिरोजा लगेच बाहेर पडल्या. तेवढ्यात रिक्षा पळून गेली. रिक्षातून उतरल्यावर बेगम यांच्या गळ्यात २ तोळ्यांचा सोन्याचा गोफ गायब झाला होता. 

फिरोजा बेगम यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये बऱयाच रिक्षांमध्ये फक्त महिला प्रवासी जाणूनबुजून बसल्य़ाचं लक्षात आलं. विशेष म्हणजे लूटमार करणारी ही महिलांची टोळी असल्याचं समोर आलं. त्याचं नेतृत्व नांदेडमधल्या रंजिता आणि कुमा पात्रे या दोन सख्ख्या जावा करत होत्या.   

नांदेडचं पासिंग असलेली ही रिक्षा वर्धा मार्गे नागपूरला येऊन चोऱ्या करुन निघून जायची. बिंग फुटल्यावर या दोन चोरट्या जावा आणि रिक्षाचालकाला अटक करण्यात आलीय. या टोळीनं नागपूरातल्या किती महिलांना गंडा घातलाय, याचा पोलीस तपास करतायत.