पुणे | एकतर्फी प्रेम | लग्नाला नकार दिल्याने सर्वांसमोर त्याने तिचे कपडे फाडले

एकतर्फी प्रेमातून पुण्यात ही घटना घडली आहे. यामुळे या महिलेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Updated: Sep 20, 2021, 08:51 PM IST
 पुणे | एकतर्फी प्रेम | लग्नाला नकार दिल्याने सर्वांसमोर त्याने तिचे कपडे फाडले

पुणे : एकतर्फी प्रेमातून पुण्यात ही घटना घडली आहे. यामुळे या महिलेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. या महिलेला या युवकाने सर्वांसमोर अश्लील शिव्या देण्यास सुरुवात केली. तुझा आणि माझा काय संबंध आहे, तू मला अशा घाण शिव्या का देत आहे, असा जाब या महिलेने या युवकाला विचारला, पण हा युवक नशेत होता आणि त्याने सर्वांसमोर या महिलेचा विनयभंग केला.

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी ३५ वर्षीय युवकाला अटक केली आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या युवकाला लग्नाला नकार दिला, म्हणून त्याने शिव्या आणि अश्लील शेरेबाजी करुन सर्वांसमोर आपला गाऊन फाडून विनयभंग केला, असा आरोप केला आहे, तसेच यावेळी तो दारुच्या नशेत होता.

ही घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तुझा आणि माझा काय संबंध आहे, तू मला अशा घाण शिव्या का देत आहे, असा जाब या महिलेने या युवकाला विचारला, पण हा युवक नशेत होता आणि त्याने सर्वांसमोर महिलेच्या हाताला मारहाण केली आणि गाऊन फाडल्याचा आरोप महिलेने केला आहे. विनंयभंगाच्या आरोपाखाली या युवकाला अटक करण्यात आली आहे.