केडीएमसीत शिवसेना भाजपमध्ये जुंपली, महापौरांनी सभा गुंडाळली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत भाजप-शिवसेना सदस्यांत जोरदार शाब्दीक जुंपली.

Updated: Oct 14, 2017, 07:41 AM IST
केडीएमसीत शिवसेना भाजपमध्ये जुंपली, महापौरांनी सभा गुंडाळली title=

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत भाजप-शिवसेना सदस्यांत जोरदार शाब्दीक जुंपली.

दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत भाजप सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत सभा तहकूब करण्याची मागणी केली. तर त्याला स्पष्टपणे नकार देत नियमानुसारच कारवाई केली जाईल, असे ठामपणे सांगत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी भाजपची मागणी धुडकवली. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी महासभेत जोरदार घोषणाबाजी केली. 

शिवसेनेनही त्याला प्रत्युत्तर दिलं. अखेर महापौरांनी आपल्या अधिकारात सर्व विषय मंजूर करून घेत सभा गुंडाळली. त्यामुळे अधिकच संतापलेल्या भाजप नगरसेवकांनी महापालिकेच्या आवारात महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेविकांनीही गेटजवळ घोषणाबाजी केली.