रत्नागिरी : स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि शिवसेनेचा विरोध डावलून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी आणि दुबईतील तेल कंपन्यांसोबत नाणार ऑईल रिफायनरी करार केला. हा करार केल्याने आता प्रकल्पावरून पुन्हा राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळतंय. शिवसेनेनं या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी संघर्ष यात्रेचं आयोजन केलं होतं. डोंगर तिठा ते चौके गावापर्यंत ही संघर्ष यात्रा काढण्यात आली.
संघर्ष यात्रेच्या मार्फत केंद्र सरकार व राज्य सरकारचाचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या संघर्ष यात्रेत १४ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या टप्यात हि संघर्ष यात्रा नाणार प्रकल्पाला विरोध करण्यात आला. त्यानंतर पालघरपर्यत बुलेट ट्रेनच्या विरोधापर्यत ही संघर्ष यात्रा असणार आहे... या निमित्ताने करार केलेल्या कंपन्यांना नाणारच्या भुमीवर पाय ठेवू देणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय.