'शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर...'

शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर

Updated: Jul 30, 2017, 06:02 PM IST
'शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर...' title=

ठाणे : शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर दिलेले वचन पूर्णपणे पाळते असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ठाण्यात विविध प्रकल्पांचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते.

राजकारणात युत्या होतात आणि तुटतात, मात्र ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जी युती झाली आहे त्यातून होणारी विकासकामं पाहून आनंद होत असल्याचंही उद्धव म्हणालेत. हे चांगले मनोमिलन असल्याची पावतीही त्यांनी यावेळी दिलीय.