औरंगाबाद : बर्हानपूर रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराच्या गिट्टी निर्मिती केंद्रावर विनापरवाना वीज जोडणी करताना खासगी ठेकेदार कर्मचारी विजेचा धक्का लागून गंभीररित्या भाजल्याची घटना मुक्ताईनगर इथं घडली.
विजेच्या धक्क्यानं भाजला गेलेल्या कर्मचाऱ्यांचं नाव सचिन ज्ञानेश्वर कोळी असं आहे. त्याला दोराच्या साहाय्यानं खांब्यावरून खाली उतरविण्यात आलं. नंतर मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्याला जळगावला हलविण्यात आले.