वर्धा : Worms in student meals and snacks : विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे. निकृष्ट जेवणामुळे विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. आता तर विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नास्त्यात अळ्या सापडल्याने संताप व्यक्त होत आहे. (Worms in student meals and snacks at Wardha)
जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील सरस्वती मुलीच्या वसतिगृहातील हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दररोज जेवणात अळ्या सापडत असल्याने विद्यार्थाना उपाशी राहावे लागत आहे.
निकृष्ट जेवण मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. आता तर एक दिवसानंतर जेवणात अळ्या निघत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. अशा निकृष्ट जेवणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, हा सगळा प्रकार गेल्या एक महिन्यापासून सुरु असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मेस व्यवस्थापककडे तक्रार केल्यानंतर याबाबत कोणतीच संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
ANM, GNM, B.Sc आणि फार्मसीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत. सावंगी मेघे येथील सरस्वती वसतिगृहात विदर्भातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. 6450 रुपये प्रति महिना जेवणाचा खर्च होतो. तसेच सोई सुविधेच्या नावांवर विद्यार्थांना अळ्यांचे जेवण आणि नास्ता मिळत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.