पुण्यात नक्की काय चाललंय, आधी सरपंचावर हल्ला आता उपसरपंचावर गोळीबार

Shooting on Deputy Panch Purushottam Dharwadkar : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मांजरीचे उपसरपंच पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  

Updated: May 5, 2022, 10:11 AM IST
पुण्यात नक्की काय चाललंय, आधी सरपंचावर हल्ला आता  उपसरपंचावर गोळीबार title=

पुणे : Shooting on Deputy Panch Purushottam Dharwadkar : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर विद्यमान सरपंचांकडून खूनी हल्ला करण्यात आला होता. वेगरे येथील जि. प.शाळेत ग्रामसभा चालू असताना मागील ग्रामसभेचे वृत्ताच्या कारणावरुन जीवघेणा हल्ला करण्यात आला. आता मांजरीचे उपसरपंच पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  (Shooting on Deputy Panch Purushottam Dharwadkar in Pune )

हॉटेलमध्ये एका टेबलावर बसलेल्याने दुसर्‍याशी भांडणे झाले. त्या भांडणानंतर भांडण झालेल्या व्यक्तीने  मित्रांना बोलावले. मात्र, भांडणासाठी काही संबंध नसताना आलेल्या मित्रांनी धरवाडकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी दगड, विटांनी मारहाण केल्याने धरवाडकर गंभीर जखमी झाले आहेत.  

या मारहाणप्रकरणी धारवाडकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले आणि त्यांच्या तीन मित्रांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीमधील एका हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली. 

पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. दरम्यान, गोळी त्यांना लागली नाही. हे समजताच त्यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला. तेथून मारेकऱ्यांनी पलायन केले.

धारवाडकर यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तेथील लोकांनी धारवाडकर यांना तातडीने एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात केले. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.  याबाबत अण्णा धारवाडकर यांनी सांगितले की, या भांडणाशी आपला काही संबंध नव्हता. तो केवळ मी बसलेल्या टेबलावर बसला होता. चंद्रकांत घुले आणि नंदू शेडगे हे ओळखीचे असून त्यांच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीमुळे डोक्याला जखम झाली आहे. डॉक्टरांनी 8 ते 9 टाके घातले आहे.
हडपसर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.